Table of Contents
डहाणू तालुक्यातील चीकूची ओळख
कोकण किनारपट्टीवर समुद्रच्या भाग असलेला डहाणू आहे, जिथे चीकू मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. डहाणू तालुका किनारपट्टीवर वसलेला असल्यामुळे निसर्ग, समुद्र, शेते, इथल्या समुद्राच्या वाऱ्यासोबत मिसळणारी जमीन आणि सातत्याने वाहणारे उबदार वारे यामुळे येथे पिकणारी विविध फळे खास मानली जातात व ताी उच्च प्रतीचीही असतात. पण येथे खास मानले जाते ते म्हणजे घोडवल येथील चीकू जगप्रसिद्ध आहे.
डहाणू तालुक्याची ओळख म्हणजे चीकू आणि चीकूची ओळख म्हणजे डहाणू! यांच्या उत्पादन मोठ्या प्रमाणात डहाणूमध्ये समुद्राच्या किनारेच्या भागात उत्पादन घेतले जाते. जर कुठे ‘गोड चीकू’ म्हटलं, तर कुठल्याही लोकांच्या तोंडावर सर्वप्रथम ‘डहाणू-घोलवड चीकू’ हे नाव घेतले जाते. इथल्या समुद्रकिनाऱ्यामुळे येथील वातावरण यांच्या चीकूला मिळणारी नैसर्गिक गोडी, चांगली ताजेपणा आणि साखरेसारखा सारख्या सुगंध देते. जर महाराष्ट्रातील किंवा भारतातील कुठल्याही ही ठिकाणच्या चीकूची तुलना केली, तर डहाणूमधील चीकू हा वेगळा आहे आणि खुप चांगला आहे.

डहाणू तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांच्याा मुख्य व्यवसाय हा चीकू आहे, असे म्हणता येईल. समुद्राच्या किनार्यापासून ३०-४० किलोमीटरपर्यंतचे लोक हे जास्तीत जास्त उत्पादन घेतात. येथील लोकांची शेती केवळ एक व्यावसाय नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे म्हणता येईल. येथे या उत्पादनाला जास्त महत्त्व दिला जातो.
२) शेती ही पारंपरिक पद्धत केली जाते.
डहाणूतील चीकू शेतीचा इतिहास शंभर वर्षांपेक्षा जुनाच आहे. चीकूचे मूळ उगमस्थान मध्य-अमेरिकाजवळील मेक्सिको आणि कॅरिबियन क्षेत्र मानले जाते. ब्रिटिश काळात काही व्यापारदारांनी हे फळ भारतात आणले आणि कोकणाच्या किनारी हवामानात त्याची वाढ उत्तम होते हे लक्षात आल्यावर ते मोठ्या प्रमाणात लावले गेले.
घोलवड परिसरातील जमीन आणि समुद्राचा शीत वारा यामुळे येथे झाडे जास्त वाढू लागली. जुन्या पद्धतीने शेतकरी चीकूची शेती करतात.
- नैसर्गिक खत
- कम्पोस्ट
- गोमूत्र
- तलाव आणि विहिरीचे पाणी
- गुरांच्या शेणाचे टोपण
या सर्वांवर आधारित पारंपरिक शेती हीच डहाणू खरी ताकद आहे.यामुळे ही शेती चांगल्या पदतीने घेतली जाते.डहाणू हा तालुका पालघर जिल्ह्यात येतो. आणि येथे जास्तीत जास्त उत्पादन दिसुन येते.
पारंपरिक लागवड:
शेतकरी साधारण ६ ते ८ मीटर अंतरावर रोपे लावतात. रोपे २–३ वर्षांत वाढू लागतात आणि चौथ्या-पाचव्या वर्षी फळ देतात. एक प्रौढ झाड साधारण २०० ते ३०० किलोपर्यंत उत्पादन देऊ शकते — आणि हेच डहाणूच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान आहे.
नैसर्गिक पद्धतीचे विशेष फायदे:
- चीकूची गोडी वाढते
- फळ अधिक टिकाऊ होते
- नैसर्गिक चव आणि सुगंध टिकतो
- फळ साठवण क्षमता जास्त वाढते
आज अनेक ठिकाणी रसायनावर आधारित शेती केली जाते, पण डहाणूतील बहुतेक शेतकरी अजूनही पारंपरिक आणि सेंद्रिय पद्धती जपतात. त्यामुळे “डहाणू चीकू”चा दर्जा जपला जातो.
३) डहाणू-घोलवड भागात मिळणारी चीकू
डहाणू-घोलवड या भागाला “चीकू बेल्ट” म्हणले जाते. हा बेल्ट भारतात सर्वात योग्य मानला जातो आणि या भागातील हवामानच चीकूला मिळणारी खास गोडी देते. येथे मिळणारे चीकू हे खाण्यासाठी चांगले असतात.
वाडी

चीकूला गोड बनवणारे नैसर्गिक घटक
१) समुद्राचा सतत वाहणारा थंड वारा
डहाणू हा अरबी समुद्राच्या अगदी जवळ असल्याने चीकू झाडांना थंड आणि आर्द्र हवा मिळते. आणि यासाठी उत्पादना उत्पादनासाठी अगदी चांगली असते. ही हवा फळातील साखर संतुलित ठेवते व चव टिकाऊ बनवण्यास खास मदत करते.
२) मातीतील खारटपणा आणि नैसर्गिक क्षार
घोलवड व डहाणूच्या किनारी भागातील जमीन ही या उत्पादनासाठी चांगली आहे. जमिनीत असणारे नैसर्गिक क्षार व खनिजे चीकूला वेगळी चव देतात.
३) वर्षभर २७–३०°C तापमान
उत्पाजनासाठी असलेली आवश्यक उष्ण व ओलसर हवामान उत्तम मानले जाते. डहाणूचे तापमान वर्षभर जवळपास स्थिर असल्याने चीकूची वाढ सातत्याने चांगली होते.
४) पावसामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो.
डहाणूला सरासरी २५००–३००० mm पाऊस पडतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा फळाचा आकार, रसाळपणा आणि वजन वाढवतो.
यामुळेच हा चीकू भारतभर आणि परदेशातसुद्धा प्रसिद्ध आहे.
४) चीकूचे उत्पादन, बाजारपेठ आणि निर्यात माहिती
डहाणू तालुक्यातील उत्पादन हे राज्यातील सर्वात मोठे उत्पादन आहे. अंदाजे २५,००० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र चीकू शेतीखाली आहे. यातून दरवर्षी लाखो टन फळांचे उत्पादन मिळते.
उत्पादनाची वैशिष्ट्ये
1) मार्च–मे आणि ऑक्टोबर–डिसेंबर हे मुख्य हंगाम
2) चीकूचे फळ जास्त काळ टिकते (१०–१५ दिवस)
3) महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पंजाब, आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठी मागणी
4) “Dahanu-Gholvad Chikoo” नावाने ब्रँड मार्केटिंग
बाजारपेठ
डहाणू तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रात चीकूची शेती केली जाते. एका वर्षभरात दोन पिीक मुख्यत्वे घेतले जातात. यासाठी बाजाराची मागणी हि टिकून राहते. मुंबई, सुरत, अहमदाबाद आणि दिल्ली या मोठ्या बाजारपेठ्यांमध्ये मागणी होते.
डहाणूतील चीकूचे प्रमुख बाजार —
| १) वाशी APMC | ४) अहमदाबाद |
| २) मुंबई Crawford Market | ५) बेंगळुरू |
| ३) सूरत | ६) दिल्ली आजादपूर मंडी |
निर्यात
डहाणू मधील उत्पादन हा केवळ महाराष्ट्रात नाही, तर परदेशातही ही जास्त मागणीत आहे. चीकू हा टिकाऊपणा, नैसर्गिक गोडी आणि दर्जेदार फळामुळे याकी देशातही जास्त मागणीत आहे. दुबई, कतार, कुवेत, ओमान, मलेशिया आणि सिंगापूर या देशातही ही जास्त उत्पादनाची मागणी केली जाते. डहाणूमधील उत्पादनाला मोठ्या प्रमाणात देशात निर्यात होतो.
| 1) दुबई | 5) ओमान |
| 2) कतार | 6) मलेशिया |
| 3) बहारीन | 7) सिंगापूर |
| 4) कुवेत |
डहाणू तालुक्यातील चीकू टिकाऊ, आकाराने सुंदर आणि चवीने गोड असल्याने परदेशात त्याची विशेष मागणी आहे. डहाणू तालुका हा कोकण किनारपट्टीवरील निसर्गरम्य आणि सुपीक प्रदेश म्हणून ओळखला जातो. इथली जमीन, हवामान आणि समुद्राचा सतत वाहणारा थंड वारा या दोन्हीचा संगम मिळतो व येथे पिकणारा डहाणू-घोलवड चीकू देशातील सर्वात गोड आणि दर्जेदार मानला जातो. हजारो शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय चीकू शेती असल्यामुळे “डहाणू म्हणजे चीकू आणि चीकू म्हणजे डहाणू” अशी एक आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे. डहाणूचा चीकू हे केवळ एक फळ नसून या संपूर्ण तालुक्याची अर्थव्यवस्था आणि परंपरा जपणारे एक महत्त्वाचे अस्तित्व बनले आहे.
हा लेख आवडला का?
