पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात वसलेले जव्हार हे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. हिरव्यागार डोंगररांगा, प्राचीन इतिहास, आदिवासी वारली कला, धबधबे आणि शांत परिसर या सर्वांची एकत्रित पर्यटकांना जव्हारमध्ये पाहायला मिळते. मुंबईपासून फक्त 165 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण झपाट्याने लोकप्रिय पर्यटनस्थळ बनत आहे. जव्हारचे सौंदर्य म्हणजे इथला निसर्ग आणि समृद्ध इतिहास. पावसाळ्यात येथे ढग इतके खाली येतात की जणू हात लांबवला तर स्पर्श होतील अशी भावना होते. थंड हवा, ओलसर मातीचा सुगंध, रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडी…हे सगळे मिळून जव्हारचा अनुभव अगदी वेगळाच बनतो.
१. जव्हारची ओळख
जव्हार हे प्रामुख्याने आदिवासी संस्कृतीचे केंद्र आहे. वारली समाजाचा येथे घनदाट वावर असून त्यांची पारंपरिक कला आणि संस्कृती आजही अबाधित आहे. पावसाळ्यात जव्हारचे सौंदर्य शिखरावर पोहोचते. धबधबे, धुके, हिरवेगार डोंगर आणि थंडगार हवा यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे येथे प्रवास करण्यासाठी येत असतात.
जव्हारमधील प्रमुख पर्यटन स्थळे
1. जय विलास पॅलेस (Jawhar Palace / Rajwada)
जव्हार शहरातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण. हा राजवाडा 1940 च्या सुमारास राजघराण्याने बांधला. पोर्तुगीज आणि राजस्थानी वास्तुकलेचे सुंदर मिश्रण येथे पाहायला मिळते. जुन्या काळातील शिल्पकला, पायऱ्या, दरवाजे आणि हा पॅलेस पाहिला की एकदम शाही काळात गेल्यासारखं वाटतं. मोठे दरवाजे, उंच भिंती आणि आत शिरल्यावर जाणवणारा तो शांतपणा…साधे ठिकाण म्हणता येत नाही—जव्हारच्या राजेशाही इतिहासाचा साक्षीदार आहे.
2. सनसेट पॉइंट
जव्हारमध्ये भेट देण्याजोग्या जागांमध्ये सर्वात प्रथम म्हणता येईल. येथून दिसणारा सूर्यास्त हा खऱ्या अर्थाने चित्रकारासाठी एक कॅनव्हास आहे. ढग, डोंगर आणि केशरी प्रकाशाचा खेळ पाहण्यासाठी संध्याकाळी येथे नक्की जा.
सूर्यास्त बघण्यासाठी जव्हारपेक्षा सुंदर जागा कमीच. संध्याकाळची शांत हवा, समोर पसरलेली डोंगररांग, आणि हळूहळू खाली उतरणारा सूर्य…मन अगदी स्थिर होतं. फोटो काढण्यासाठीही परफेक्ट.
3. हनुमान पॉइंट

जंगलांनी वेढलेला घाट आणि पायथ्याशी दिसणारी खोऱ्यांची रांग.
येथे शांत वातावरण आणि मंद वारा मनाला शांती देतो.
कुटुंबासोबत थांबण्यासाठी उत्तम ठिकाण म्हाणता येईल. हे ठिकाण अगदी शांत आहे.
जंगल, दरी आणि थंड हवा… बसावसं वाटतं तसं बसत राहा. येथून दिसणारे घाट आणि खाली पसरलेला परिसर खूप छान दिसतो.
4. दाभोसा धबधबा

जव्हार हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथे असलेल्या दाभोसा या परिसरात नदीचा झरा वाहतो, पण हा खुूप उंचीवरून खाली पडतो. त्यांची ३०० फूट उंचीवरून कोसळणारा हा भव्य धबधबा जव्हारचे हायलाइट आहे. मान्सूनच्या महिन्यात धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतो व इकडे सर्व परिसर हेिरवागार असतो. दिसायला अगदी खूपच सुंदर असते. पावसाळ्यात तर हा धबधबा जणू धुक्याची मोठी चादरच पसरतो. ३०० फूट उंचीवरून कोसळणारे पाणी पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. साहस आवडत असेल तर हे ठिकाण चांगले आहे.
५. खडकपडा धरण
खडकपडा धरण येथे वरती बांध आहे, व त्याच्या खाली अंघोळ करण्यासाठी पाणी आहे, व खाली ते पाणी खाली जाते. तिथून खुपच खाली हे पाणी जाते. ते हे पाहण्यासारखे आहे. शांत, स्वच्छ आणि फोटोग्राफीसाठी उत्तम. फोटो काढण्यासाठी, शांत वेळ घालवण्यासाठी, पाणी पाहत गप्पा मारण्यासाठी उत्तम. पावसाळ्यात परिसर चांगला आहे.
४. जव्हार पर्यटन मार्गदर्शक (Complete Travel Guide)
जव्हारला कसे जायचे?
1. मुंबई → जव्हार (165 किमी)
( मार्ग: मुंबई – कसारा – इगतपुरी – ट्रायबल रोड – जव्हार )
2. ठाणे → जव्हार (140 किमी)
3. नाशिक → जव्हार (80 किमी)
जव्हारमध्ये या वेळ्यात जाण्यास सर्वोत्तम असते.
| महिना | हवामान | अनुभव |
| जून – सप्टेंबर | पावसाळा | धबधबे आणि हिरवाई |
| ऑक्टोबर – फेब्रुवारी | थंड हवेचा काळ | पर्यटनासाठी सर्वोत्तम |
| मार्च – मे | उन्हाळा | गरम पण सकाळ-संध्याकाळ ठीक |
राहण्यासाठी ठिकाणे
- MTDC Resort
- Sunset Point Resort
- Private Nature Resorts
- Local homestay (आदिवासी संस्कृती अनुभवायला उत्तम)
५. एका दिवसात जव्हार फिरण्यासाठी सर्वोत्तम प्लॅन
सकाळ
जय विलास पॅलेस भेट
जई सागर तलाव
दुपार
वारली आर्ट सेंटर
स्थानिक जेवण
दुपारनंतर
दाभोसा धबधबा
संध्याकाळ (6:00 PM)
सनसेट पॉइंट
जव्हार हे प्रामुख्याने आदिवासी संस्कृतीचे केंद्र आहे. वारली समाजाचा येथे घनदाट वावर असून त्यांची पारंपारिक कला आणि संस्कृती आजही पहण्यास मिळते. पावसाळ्यात जव्हारचे सौंदर्य शिखरावर पोहोचते. धबधबे, धुके, हिरवेगार डोंगर आणि थंडगार हवा पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे भेट देत असतात.
हा लेख आवडला का?
