Table of Contents
GI TAG म्हणजे काय?

GI TAG म्हणजे Geographical Indication Tag (भौगोलिक निर्देशांक चिन्ह). एखादे उत्पादाला त्याच्या विशिष्ट भौगोलिक ठिकाणामूळे ओळख.गुणवत्ता आणि प्रतिष्ठा देण्यासाठी मिळतो.ज्यामुळे बनावट उत्पादने थाबतात. त्या ठिकाणी होणीरे उत्पादन ह्याला चांगला भाव मिळतो तसेच द्शाच्या अनोख्या उत्पादनांना जागतिक ओळख मिळते. हा एक बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Right – IPR) आहे. एखादे उत्पादन विशिष्ट भौगोलिक प्रदेशाशी संबंधित असेल आणि त्या प्रदेशामुळेच त्याला विशिष्ट गुणवत्ता, प्रतिष्ठा किंवा वैशिष्ट्य प्राप्त झाले असेल, तर अशा उत्पादनालाभौगोलिक मानांकन दिला जातो. सोप्या शब्दांत सांगायचे तर, “हे उत्पादन याच ठिकाणचे आहे आणि त्याची खास ओळख याच प्रदेशामुळे आहे” हे जगाला सांगण्यासाठी GI TAG दिला जातो.
भौगोलिक मानांकन का दिला जातो?
भौगोलिक मानांकन देण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. ही कारणे आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि कायदेशीर अशा सर्व स्तरांवर महत्त्वाची आहेत.
१) विशिष्ट प्रदेशाची ओळख जपण्यासाठी
एखादे उत्पादन एखाद्या ठराविक प्रदेशातच तयार होते आणि त्या प्रदेशाच्या हवामान, माती, पाणी, कौशल्य व परंपरेमुळे त्याची वेगळी ओळख निर्माण होते.व त्यासाठी होणारे उत्पाद घेतला जातो.आणि या उत्पादन या योग्या किमात मिळावी तसेच त्या ठिकाणी घेतले जाणारे उत्पादन याला योग्या किंमत मिळावी यासाठी GI TAGहा दिला जातो.
उदाहरणार्थ –
- दार्जिलिंग चहा : दार्जिलिंगच्या हवामानामुळे त्याला विशिष्ट सुगंध आणि चव मिळते.या ठिकाणी होणारे उतपादन खुप महत्त्वाचे असते.म्हणुन याला भौगोलिक मानांकन दिला जातो.
- कोल्हापुरी चप्पल : कोल्हापूर परिसरातील कारागिरांचे कौशल्य आणि पारंपरिक पद्धती यामुळे तिची वेगळी ओळख आहे.अशा उत्पादनांची मूळ ओळख जपण्यासाठी GI TAG दिला जातो.
- घोडवल चिकू डहाणू येथे घेतला जाणारा चिकूच्या उत्पादन हा खुप महत्त्वाचा आहे.या ठिकाणीच्या हवामान हा या चिकू उत्पादन घेण्यासाठी योग्या आहे.
२) बनावट आणि नक्कल रोखण्यासाठी
आत्ताच्या बाजारामध्ये अनेक उत्पादन हा मोठ्याप्रमाणात घेतला जातो.आणि ते चांगल्या भावात विकला जातो.व ज्या शेतकरा उत्पादन चांगला असतो पण त्याला काही भाव मिळत नाही तर त्याचा उत्पादनाचा काही उपयोग जास्त होत नाही.यासाठी एखाद्या ठिकाणी होणारे विशिष्ट उत्पादन याला चांगला भाव मिळवा.यासाठी भौगोलिक संकेत चिन्हा हा दिला जातो.
आज बाजारात अनेक प्रसिद्ध उत्पादनांची नक्कल मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे मूळ उत्पादकांचे आर्थिक नुकसान होते आणि ग्राहकांची फसवणूकही होते.
भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर:हा उत्पादन हा त्याच ठिकाणाचा योग्या असा भव हा मिळत असतो.
त्या नावाने फक्त त्या ठराविक प्रदेशातील उत्पादकांनाच उत्पादन विकण्याचा अधिकार मिळतो.
इतर कोणीही त्या नावाचा गैरवापर करू शकत नाही.
उदाहरण – GI TAG असलेला दार्जिलिंग चहा दार्जिलिंगच्या बाहेर पिकवलेला असेल तर तो त्या नावाने विकता येत नाही.
३) स्थानिक कारागीर, शेतकरी आणि उत्पादकांचे संरक्षण
GI TAG चा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्थानिक लोकांचे आर्थिक आणि सामाजिक संरक्षण.होत असते.आणि यासाठी त्या ठिकाणीच्या उत्पादन हा योग्य किमतीत मिळत असतो.
शेतकरी, कारागीर, विणकर, कलाकार यांना त्यांच्या कलेचा योग्य मोबदला मिळतो.
त्यांच्या उत्पादनाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ओळख मिळते.
मध्यस्थांचा गैरफायदा कमी होतो.
उदाहरण – पैठणी साडी, वारली चित्रकला, नागपूर संत्री यामुळे स्थानिक लोकांच्या उत्पन्नात वाढ होते.असे अनेक उत्पादनाला GI TAG हा मिळालेला आहे.आणि ता मात्र याला योग्या असे स्थान हा मिळतो आहे.
४) देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन
भारतासारख्या देशात प्रत्येक राज्याची, जिल्ह्याची वेगळी परंपरा, कला आणि खाद्यसंस्कृती आहे. GI TAG हे त्या परंपरेचे अधिकृत प्रमाणपत्र असते.
यामुळे:
पारंपरिक कला आणि कौशल्य जिवंत राहते.
पुढील पिढीला आपल्या परंपरेचा अभिमान वाटतो.
सांस्कृतिक वारसा नष्ट होण्यापासून वाचतो.
उदाहरण – मधुबनी चित्रकला, वारली कला, कांचीपुरम साडी.
५) उत्पादनाच्या गुणवत्तेची खात्री
भौगोलिक मानांकन असलेले उत्पादन ठराविक निकषांनुसारच तयार करावे लागते.
यामुळे:
- उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते.
- ग्राहकांना विश्वास मिळतो की हे उत्पादन अस्सल आहे.
- ब्रँड व्हॅल्यू वाढते.
उदाहरण – GI TAG असलेला मसाला, चहा किंवा साडी म्हणजे दर्जेदारच असणार, अशी ग्राहकांची खात्री होते.
६) आर्थिक विकासाला चालना
GI TAG मुळे संपूर्ण प्रदेशाचा आर्थिक विकास होतो.आणि यांची मागणी ही वाढत असते.त्याला चांगल्या किंमतीत ही उत्पादन हा विकता येतो.
कारणे:
- उत्पादनाची मागणी वाढते.
- निर्यात वाढते.
- रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
- पर्यटनालाही चालना मिळते.
उदाहरण – दार्जिलिंग, कांचीपुरम, कोल्हापूर ही ठिकाणे त्यांच्या GI TAG उत्पादनांमुळे अधिक प्रसिद्ध झाली आहेत.
७) आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षण
GI TAG हा केवळ देशांतर्गत नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संरक्षण देतो.
भारत जागतिक व्यापार संघटना (WTO) च्या TRIPS कराराचा सदस्य असल्यामुळे:
भारतीय GI TAG असलेली उत्पादने परदेशातही सुरक्षित राहतात.
इतर देशांमध्ये नावाचा गैरवापर थांबवता येतो.
८) ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी
GI TAG मुळे ग्राहकाला खरी माहिती मिळते. जो नकली उत्पादनांना बादारात येण्यापासून रोखता येते.आणी जेणे करुन ग्राहकांना अस्सल चांगले उत्पादन हम मिळवता येईल.
ग्राहक:
अस्सल उत्पादन ओळखू शकतो.
दर्जेदार वस्तू खरेदी करू शकतो.
फसवणूक टाळली जाते.
भारतामध्ये GI TAG कोण देतो?

भारतामध्ये GI of Goods (Registration and Protection) Act, 1999 अंतर्गत भौगोलिक मानांकन दिला जातो.
यासाठी:
चेन्नई येथील Geographical Indications Registry कार्यरत आहे.
अर्ज तपासल्यानंतरच GI TAG मंजूर केला जातो.
GI TAG टॅग मिळवण्याची प्रक्रिया-
अर्ज- उत्पागन घेणारी संस्था किवा व्यक्ती भौगोलिक संकेत GI ऑफिसमध्ये अर्ज करतात.
२.तपासणी-अधिकारी हे या उत्पादनाची वैशिष्ट्ये गुणवत्ता आणि भौगोल्क याची तपासणी ही घेत असतात.
३.प्रकाशन आणि आक्षेप- अर्जाची माहिती अधिसुचित केली जाते.जेणेकरुण कोणी आक्षेप घेऊ उच्छिक हा घे़ऊ शकतो.
४.मान्यता-कोणीतीही आक्षेप नसल्यास किंवा आक्षेप फेटाळ्यास भौगोलिक मानांकन दिला जातो.
फायदे-
१.उत्पादनाला कायदेशीर संरक्षण मिळते.
२.आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश हा मिळतो.
३.त्या विशिष्ट उत्पादनाचा किवा परंपरेचे जतन होते.
GI TAG हा केवळ एक टॅग नसून तो त्या प्रदेशाची ओळख, परंपरा, गुणवत्ता आणि लोकांचे कष्ट यांचा सन्मान आहे.
तो:
स्थानिक उत्पादकांचे संरक्षण करतो,
देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करतो,
आर्थिक विकासाला चालना देतो,
आणि ग्राहकांना अस्सल उत्पादनाची खात्री देतो.
म्हणूनच भौगोलिक मानांकन दिला जातो — प्रदेशाची ओळख जपण्यासाठी, गुणवत्तेची हमी देण्यासाठी आणि स्थानिक लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी.तसेच त्या ठिकाणाला मिळनारा भाव हा चांगला असावा यासाठी हाGI TAG दिला जातो.यांचा एक ओळख ही नि्रमाण होत असते.या उत्पादनाला मागणी ही खुप जास्त असते.
हा लेख आवडला का?
